भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी-भाजप-मनसेत चुरस

Last Updated: Friday, April 4, 2014, 09:07

ठाण्यातील भिवंडी मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि मनसे अशी तिरंगी लढत होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेले कपील पाटील यांच्या कामगिरीकडे अनेकांचं लक्ष असणार आहे.

LIVE -निकाल भिवंडी

Last Updated: Friday, May 16, 2014, 18:08

प्रोफाईल मतदारसंघाचं : भिवंडी

`त्या` कामाला नकार दिल्यानं तिच्यावर अमानुष अत्याचार

Last Updated: Monday, March 24, 2014, 09:28

अतिशय अमानुष अशी घटना भिवंडीत घडलीय. वेश्याव्यवसाय करण्यास नकार दिल्यानं तरूणीवर अमानुष कृत्य करण्यात आलंय. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केलीय. तर दोघं फरार झालेत.

राहुल गांधी आज मुंबई आणि भिवंडीत

Last Updated: Thursday, March 6, 2014, 11:50

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आज मुंबई दौरा आहे. राहुल गांधी आज सकाळी ते वर्सोवा बीचला जाणार आहेत.

आंतरजातीय विवाहाचा राग, सासरच्यांनी केलं सूनेचं मुंडण

Last Updated: Monday, October 14, 2013, 21:14

घरच्यांचा विरोध असतानाही मुलानं आंतरजातीय विवाह केल्याच्या राग त्याच्या नातेवाईकांनी नववधूवर काढून तिचं मुंडण केल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडीमध्ये घडलाय. या प्रकरणी भिवंडीतल्या पडघा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आलीय. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. दरम्यान, आता या प्रकरणी महिलेच्या सासरच्या तिघांना अटक करण्यात आलीय.

इमारत दुर्घटना : अखेर सरकारला जाग!

Last Updated: Thursday, July 4, 2013, 14:07

कोसळणाऱ्या इमारतींसाठी इमारतीच्या आर्किटेक्ट आणि इंजिनिअरलाही जबाबदार धरलं जाणार असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेत.

भिवंडीत कोसळली इमारत; तिघांचा मृत्यू

Last Updated: Thursday, July 4, 2013, 15:08

भिवंडीमध्ये नारपोली परिसरात एक दोन मजली इमारत जमीनदोस्त झालीय. रात्री साडेबारा ते दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

भिवंडीत बिल्डरवर गोळीबार

Last Updated: Sunday, May 5, 2013, 14:50

जिल्ह्यातील भिवंडीमध्ये मोटार सायकलवरून आलेल्या काही अज्ञातांनी एका बिल्डरवर गोळीबार केला. या गोळीबारात बिल्डर गंभीर जखमी झाला आहे.

कारमध्ये तीन मुलांचा गुदमरून मृत्यू

Last Updated: Thursday, April 25, 2013, 23:25

भिवंडी तालुक्यात खुल्या गोदामातील नव्या कारमध्ये अडकलेल्या तीन लहान मुलांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी रात्री ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

गुड न्यूज : वसई-दिवा मार्गावर लोकल!

Last Updated: Thursday, April 4, 2013, 10:57

वसई - दिवा रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर... आता या रेल्वेला उपनगरीय रेल्वेचा दर्जा मिळणार आहे. त्यामुळं या मार्गावरुन लवकरच लोकल ट्रेन धावताना दिसणार आहेत.

भिवंडी महापालिकेत ५८ पदांसाठी भरती

Last Updated: Thursday, March 28, 2013, 18:17

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत ५८ जागा भरण्यात येणार आहे. वेगवेगळ्या पदासाठी भिवंडी महापालिकेत जागा भरती जाहीर करण्यात आली आहे.

वाद टाळायला हवेत- उद्धव ठाकरे

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 23:13

लोकप्रतिनिधी आणि पोलिसांमधील वाद चुकीचा असून, असे वाद टाळायला हवेत, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलंय. भिवंडीतल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरेंनी भाषण केलं.

परतीच्या पावसाचे तीन बळी

Last Updated: Tuesday, October 2, 2012, 08:50

दिवसभर उकाड्याने घाम निघालेल्या मुंबई, नवी मुंबई, ठाणेकरांना सोमवारी सायंकाळी परतीच्या पावसाने सुखद दिलासा दिला. मात्र, भिवंडीत दुदैवी घटना घडली. भिवंडीत वीज कोसळून तीन युवकांचा मृत्यू झाला.

कोण आहे आपला नगरसेवक? - भिवंडी

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 09:03

परभणी ४६ जागांसाठी आपला उमेदवार निवडला आहे. हा विजयी उमेदवार आता पुढच्या पाच वर्षासाठी महापालिकेत तुमचे प्रतिनिधीत्व करणार आहे. तर कोण आहे तुमचा नगरसेवक जाणून घ्या.....

पाच महापालिकांच्या रणसंग्रामाचा आज निकाल

Last Updated: Monday, April 16, 2012, 10:51

राज्यातील पाच महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. लातूर महापालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून मालेगाव, परभणी आणि भिवंडी यांची मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. तर चंद्रपुरात मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरूवात होईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सेना-भाजपात राडा, तोडफोड हाणामारी

Last Updated: Sunday, April 15, 2012, 17:27

भिवंडीतल्या फेनापाडा भागात मतदान दरम्यान शिवसेना आणि भाजपमध्ये वाद झाला. यात दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. तसंच भाजपचा बुथही तोडल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.

५ पालिकांसाठी मतदान सुरू, प्रतिसाद अत्यल्प

Last Updated: Sunday, April 15, 2012, 11:44

राज्यातल्या पाच महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भिवंडी, मालेगाव, लातूर, चंद्रपूर आणि परभणीत मतदान होत आहे. मतदानकेंद्राबाहेर मतदानासाठी मतदारांच्य़ा अत्यल्प असा प्रतिसाद दिसून आला.

बनावट व्होटिंग कार्ड बनवणारी टोळी जेरबंद

Last Updated: Saturday, April 14, 2012, 20:34

रविवारी होत असलेल्या भिवंडी महापालिका निवडणुकीपुर्वी क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत बनावट व्होटींग कार्ड आणि रेशनिंग कार्ड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. सात जणांची टोळी जेरबंद करण्यात आलीय.

भिवंडीत महिलेसह चार मुलांचे मृतदेह

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 13:21

भिंवडीजवळील आनगाव भागातल्या नदीत पाच जणांचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातल्या पाच जणांचे हे मृतदेह आहेत. दरम्यान, हा घातपात आहे की अपघात याची पोलीस चौकशी करीत आहेत. मात्र, एकाचवेळी पाच मृतहेह सापल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भिवंडीत घातपाताचा कट? स्फोटकं जप्त

Last Updated: Sunday, April 1, 2012, 23:22

भिवंडीजवळ एका टेम्पोमधून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. जिलेटिनचे ५३ बॉक्स, १८ बॉक्स डिटोनेटर, फ्यूजचे अठरा बंडल आणि दिडशे किलोग्रॅम अमोनिअम नायट्रेट जप्त करण्यात आले आहेत. पडघा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

भिवंडीत डाईग कंपनीला भीषण आग

Last Updated: Saturday, January 14, 2012, 08:41

ठाण्यातल्या भिवंडी इंथ डाईग कंपनीला लागलेली भीषण आग अटोक्यात आलीय. भिवंडीतल्या धामनकर नाका परिसरातील मोदी डाईंग कंपनीला भीषण आग लागली होती.