Last Updated: Thursday, September 13, 2012, 23:17
www.24taas.com, मुंबईव्यंगचित्रकार असीम त्रिवेदी अवाजवी महत्व दिलं जात आहे.त्यांनी देशद्रोहाचा सारखा गंभीर गुन्हा केलेला नाही. पण व्यंगचित्रकारान व्यंगचित्र काढताना मर्यादा बाळगायला हवी, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना कार्याध्यक्षांनी घेतली आहे.देशाची सध्याचे भ्रष्टाचारी चित्र पाहता देशातील भ्रष्टाचारी मंत्र्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करायला हवे अशी मार्मिक टीकाही उध्दव ठाकरेंनी केली.
बुधवारीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कार्टूनप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या असीम त्रिवेदींची पाठराखण करत सरकारवर जोरदार आगपाखड केली होती. ‘राजद्रोह कशास म्हणावं हे सरकारला कळत नसतांना नसती उठाठेव कशासाठी?’ असा सवालही बाळासाहेबांनी केला होता. राज ठाकरेंनी असीमला पाठिंबा दर्शवल्यावर बाळासाहेबांनी असीमला आपला पाठिंबा दिला होता. मात्र उद्धव ठाकरे यांची भूमिका राज ठाकरेच नव्हे, तर बाळासाहेबांपेक्षाही वेगळी वाटत आहे.
राज ठाकरे यांनी असीमची पाठराखण करताना व्यंगचित्रांवर देशद्रोहाचं कलम लावणं चुकीचं आहे अशी भूमिका घेतली होती. बाहेरच्या देशातले लोक येतात, गुन्हे करतात, पण त्यांना अजूनही शिक्षा होत नाही. मात्र त्यावर भाष्य केलं तर मात्र देशद्रोह ठरतो... हे चुकीचं आहे. चित्रांतून भावना व्यक्त करणं चुकीचं नाही. असं राज ठाकरे म्हणाले होते.
First Published: Thursday, September 13, 2012, 23:17