Last Updated: Tuesday, February 12, 2013, 11:51
www.24taas.com, मुंबईव्हॅलेनटाईन डेच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दहशतवादी करावाया होऊ शकतात असे अलर्ट मुंबई पोलीसांना देण्यात आलेत. विशेषतः मुंबई पश्चिम भागातील बांद्रा आणि जूहू भागात हे विशेष सिक्युरिटी अलर्ट देण्यात आले आहेत. कारण या भागातील बांद्रा बँण्डस्टॅण्ड, रिक्लेमेशन आणि जुहू बीच या भागात मोठ्या प्रमाणात व्हॅलेनटाईन साजरा केला जातो.
त्यासाठी या ठिकाणी विशेष अलर्ट देण्यात आलेत. एवढचं नाही तर मुंबई पोलीस कमिशनर सत्यपाल सिंग यांनी पश्चिम मुंबईतील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची एक बैठक बोलावली होती. नुकतचं संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड अफ़ज़ल गुरुला फाशी दिल्यानंतर अनेक दहशतवादी संघटनांनी जाहीरपणे भारतात दहशतवादी कारवाई करण्याच्या धमक्या दिल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर मुंबईत कधीही कोठेही दहशतवाद्या करावाया होऊण्याची शक्यता आहे त्यामुळे हे सिक्युरिटी अलर्ट देण्यात आलेत असं मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
First Published: Tuesday, February 12, 2013, 11:35