अस्तित्वात नसलेले बंगलेही बनतायत हेरिटेज! Vanished buildings also announced as Haritage

अस्तित्वात नसलेले बंगलेही बनतायत हेरिटेज!

अस्तित्वात नसलेले बंगलेही बनतायत हेरिटेज!
www.24taas.com, मुंबई

राज्य सरकारच्या हेरिटेज समितीनं मुंबईतल्या एकूण 948 ऐतिहासिक वास्तूंना पुरातत्व वास्तूंचा दर्जा देत त्यांचं संवर्धन आणि जतन करण्याचे आदेश जारी केलेत. आश्चर्याची बाब म्हणजे अस्तित्वात नसलेले बंगलेही सरकारनं पुरातन म्हणून घोषित केलेत. या निर्णयाला मुंबईकरांचा विरोध होऊ लागलाय.

गेल्या 5 ते 10 वर्षांत उभारलेल्या वांद्र्यातल्या इमारतींना राज्य सरकारच्या दफ्तरात मात्र त्यांना हेरिटेज असा दर्जा देण्यात आलाय... याचं कारण असं की, हे टॉवर जिथं आहेत, तिथं पूर्वी जुने बंगले होते. आता हे बंगले प्रत्यक्षात दिसत नसले, तरी सरकार दरबारी मात्र त्यांची नोंद हेरिटेज वास्तू म्हणून करण्यात आलीये.

यासोबत मुंबईतल्या सुमारे साडेनऊशे वास्तूंना राज्य सरकारनं हेरिटेज दर्जा दिलाय. यात मुंबईची सर्वात जुनी वस्ती असलेले कोळीवाडे, बीडीडी चाळी, इतर जुन्या चाळी, जुने बंगले आणि अनेक पर्यटन स्थळांचा समावेश आहे. सेटं एन्ड्रयूजचं ओडिंटरियम आणि महाविघालयही शंभर वर्ष जुनं असल्यानं हेरिटेजच्या यादीत टाकण्यात आलंय. या लाल फितीच्या कारभाराला मुंबईकरांचा विरोध आहे.शहरातल्या ख-याखु-या ऐतिहासिक वास्तूंच जतन करण्याचं सोडून मुंबईकरांना हद्दपार करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप महापौरानी केलाय.

अनेक पुरातन वास्तू असलेली मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं पर्यटनस्थळ आहे. मात्र आजही दैनंदिन वापरात असलेल्या अनेक वास्तू आणि स्थळं या यादीत ढकलल्यामुळे याला विरोध होऊ लागलाय. हेरिटेज म्हणून जाहीर केलेल्या या मालमत्तांना सरकारनं किमान करसवलत द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागलीये.

First Published: Tuesday, September 11, 2012, 21:43


comments powered by Disqus