Last Updated: Sunday, February 16, 2014, 15:15
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईच्या पोलीस आयु्क्तपदी नियुक्ती न झाल्यानं विजय कांबळे हे प्रचंड नाराज़ असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत्ये. त्यांची नियुक्ती करण्यात आलेल्या ठाणे आयुक्तपदाचा ते पदभार स्विकारणार नाहीत अशीही खात्रीलायक सुत्रांची माहिती आहे.
एवढचं नाही तर ते पोलीस सेवेतून बाहेर पडायच्या विचारात आहेत. काल सेवा ज्येष्ठता डावलून राकेश मारीया यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाल्यानं विजय कांबळे हे प्रचंड नाराज़ आहेत.
दरम्यान मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी विजय कांबळेंना डावलल्यानं रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केलीय. विजय कांबळे यांची निवड न होणे हे अन्यायकारक असल्याचं आठवलेंनी म्हटलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, February 16, 2014, 14:09