Last Updated: Saturday, January 18, 2014, 20:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या तक्रारीवरुन अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळलेत.
दोन्ही नगरसेविकांनी केलेले सारे आरोप कपोलकल्पित असून ते त्यांनी सिद्ध करावेत असं आव्हान घोसाळकर यांनी यावेळी केलं.या प्रकरणी कोणत्याही चौकशीला तयार असून या आरोपांमुळे आपल्या 22 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचं नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केलाय.
दरम्यान, शिवसेनेचे दहिसर येथील आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात शुक्रवारी रात्री दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांची रुग्णालयात जाऊन जबानी घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
व्हिडिओ पाहा - पाहुयात, विनोद घोसाळकरांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना काय काय उत्तरं दिलीत... •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, January 18, 2014, 20:00