माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जातंय - घोसाळकर

Last Updated: Saturday, January 18, 2014, 20:41

नगरसेविका शितल म्हात्रे यांच्या तक्रारीवरुन अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळलेत.

विनोद घोसाळकरांकडून आरोपांचं खंडण

Last Updated: Saturday, January 18, 2014, 11:28

नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरुन अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी आपल्यावरील आरोपांचं खंडण केलंय. त्यांना तसा कांगावा केला आहे.

शीतल म्हात्रे प्रकरणी मुंबई पालिकेत हंगामा

Last Updated: Saturday, January 18, 2014, 07:58

शिवसेनेच्या नगसेविका शीतल म्हात्रे यांच्या आरोपानंतर आमदार विनोद घोसाळकर यांच्यावर कारवाई झाली नाही. म्हात्रे यांचा प्रश्न सोडविण्यात आला नाही. त्यामुळे महासभा सर्व महिला नगरसेवकांच्या सुरक्षितता आणि सन्मानासाठी कटिबद्ध आहे, असा ठराव मांडण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे केली. मात्र, याला काही शिवसेना नगरसेवकांनी कडाडून विरोध केल्याने पालिकेत गोंधळ पाहयाला मिळाला.

शिवसेना आमदार घोसाळकर यांच्याविरोधात गुन्हा

Last Updated: Saturday, January 18, 2014, 07:14

शिवसेनेचे दहिसर येथील आमदार विनोद घोसाळकर यांच्याविरोधात शुक्रवारी रात्री दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांची रुग्णालयात जाऊन जबानी घेतल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

‘द्रौपदींनो’ घाबरु नका... ‘मनसे’ तुमच्या पाठिशी आहे!

Last Updated: Friday, January 17, 2014, 18:56

शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी विनोद घोसाळकरांविरोधात आपली मानसिक छळवणूक केल्याची तक्रार केल्यानंतर महिला आयोगाला दखल घ्यावी लागली पण, शिवसेनेनं मात्र आपल्या पक्षातील ‘द्रौपदीं’साठी काहीही हालचाल केली नाही. त्यामुळे या ‘द्रौपदीं’च्या मदतीला शिवसेनेचा भाऊ ‘मनसे’ मैदानात उतरलाय.

शीतल म्हात्रेंचे आरोप आमदार घोसाळकर यांनी फेटाळले

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 21:10

आमदार विनोद घोसाळकर यांनी शीतल म्हात्रे यांनी लावलेले आरोप फेटाळून लावले आहेत. पक्ष नेतृत्वाने प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते, मात्र माजी महापौर शुभा राऊळ आणि नगरसेविका शीतल म्हात्रे या चौकशीच्या बैठकीला उपस्थित राहिले नसल्याचं विनोद घोसाळकर यांनी म्हटलं आहे.

बाळासाहेबांनी घोसाळकरांचा राजीनामा फेटाळला

Last Updated: Saturday, November 5, 2011, 11:53

मातोश्रीवर राजीनामा देण्यासाठी गेलेल्या आमदार विनोद घोसाळकरांचा राजीनामा फेटळाण्यात आला, सकाळी ११ वाजता राजीनामा देणयासाठी डेरेदाखल झालेल्या विनोद घोसाळकरांचा राजीनामा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा फेटाळला.

निरुपमच्या तोंडाला मी काळं फासणारच...

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 18:13

विनोद घोसाळकर
मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे. कारण माझ्या पदापेक्षा मला नेहमीच मराठी स्वाभिमान हा मला हजारपटीने जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण, मी हाडाचा शिवसैनिक आहे. हे संजय निरुपमने लक्षात ठेवावं.