Last Updated: Wednesday, June 11, 2014, 14:05
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईप्रत्येक घरात पोलीस दिला तरी महिलांवरचे अत्याचार रोखता येणार नाहीत, असं वक्तव्य गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केलंय. नैतिक घसरणीमुळे बलात्काराचं प्रमाण वाढलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
उत्तर प्रदेशात महिलांवर अत्याचाराच्या गुन्ह्याची सर्वात जास्त नोंद आहे. महाराष्ट्रात मात्र अन्य राज्यांच्या तुलनेत महिलांवरचे अत्याचार कमी असल्याची माहिती त्यांनी विधान परिषदेत दिलीय. येत्या महिन्याभरात मुंबईत महिलांचं कमांडो पथक तैनात करण्यात येणार असून महिला सुरक्षेसाठी पोलिसांना 500 वाहनं देणार असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली.
42 टक्के बलात्कार ओळखीच्या व्यक्तीकडून केले जातात. मुंबईत महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी 200 दुचाकीस्वार महिलांचे कमांडो पथक तयार करणार असून महिलांच्या सुरक्षेसाठी 500 वाहने घेणार आहेत. यातील प्रत्येक वाहनात एक महिला अधिकारी असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, June 11, 2014, 14:01