विश्व मराठी साहित्य संमेलन होणार, vishwa marathi sahitya sammelan

विश्व मराठी साहित्य संमेलन होणार

विश्व मराठी साहित्य संमेलन होणार
www.24taas.com,मुंबई

टोरांटो येथे ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान होणारे चौथे विश्व मराठी साहित्य समेलन अखेर रद्द झाल्याचे वृत्त येताच या संमेलनाचे आयोजक यांनी हे संमेलन होणार असल्याचे म्हटले आहे. निमंत्रक लीना देवधरे यांनी याबाबत झी २४ तासशी बोलतना म्हटले आहे, हे संमेलन होणारच आहे.

टोरांटो येथे होणारे संमेलन रद्द कण्याबाबची अधिकृत घोषणा शनिवारी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या संमेलनाबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. दरम्यान महामंडळाच्या कार्यवाह उज्वला मेहंदळे यांनी म्हटले होते, संमेलन आम्ही रद्द केलेले नाही. टोरांटोतील संमेलनाच्या संयोजकांकडून भारतातून सर्वाना घेऊन जाता येतील इतकी तिकीटे आणि पैसे आम्हाला मिळू शकले नाहीत, असे सांगण्यात आले. त्यामुळे आम्ही संमेलनाला जाऊ शकणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे अप्रत्यक्ष दुजोरा मिळाला.

दरम्यान, आज विश्व संमेलनाबाबत निमंत्रक लीना देवधरे यांनी स्पष्ट करताना सांगितले, हे संमेलन रद्द झालेले नाही. नियोजित तारखेला हे संमेलन होईल.

First Published: Saturday, August 25, 2012, 08:12


comments powered by Disqus