वाकोला दुर्घटना : कारवाईला आडकाठी करणारेच जबाबदार - महापौर, Wakola Accident : resistant responsible

वाकोला दुर्घटना : कारवाईला आडकाठी करणारेच जबाबदार - महापौर

वाकोला दुर्घटना : कारवाईला आडकाठी करणारेच जबाबदार - महापौर
www.zee241taas.com, झी मिडीया, मुंबई

महापौर सुनील प्रभू यांनी वाकोल्यातल्या दुर्घटनाग्रस्त इमारतीला भेट दिली आणि मदतकार्याची पाहाणी केली. या घटनेला कारवाईला आडकाठी करणारेच जबाबदार आहेत, असा आरोप महापौर प्रभू यांनी केलाय. दरम्यान, या घटनेला महापालिकाच जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका सुनयना पोतनिस यांनी केलाय.

महापालिका अधिकारी ही इमारत रिकामी करण्यासाठी गेले होते. मात्र कोर्टातून स्टे आणल्यामुळे ती पूर्णपणे रिकामी होऊ शकली नाही. कारवाईला आडकाठी आणणारेच या घटनेला जबाबदार असल्याचा आरोप प्रभू यांनी केलाय. यादुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून चारजण जखमी आहेत.. अजूनही अग्निशमनदलाचं बचाव कार्य सुरू आहे.

मुंबईतल्या वाकोल्यात न्यू शंकरलोक नावाची सात मजली इमारत कोसळलीय. ही इमारत बाजूच्या चाळीवर कोसळलीय. या दुर्घटनेत सुधा श्रीधरन नावाच्या महिलेचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले आहेत. ढिगा-याखाली अजून सात ते आठ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ही जुनी इमारत असल्यामुळे याआधीच रिकामी करण्यात आली होती. मात्र अजूनही त्यामध्ये एक ते दोन कुटुंब राहत होते. तसंच चाळीमध्ये चार ते पाच कुटुंब राहत होते. ३५ वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र काही वर्षांपासून ती मोडकळीस आली होती. इमारत पाडण्यावर सध्या स्थगिती होती.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, March 14, 2014, 17:51


comments powered by Disqus