Last Updated: Monday, October 22, 2012, 19:09
www.24taas.com, मुंबई मुंबईच्या कांदिवली भागात आपल्या दी़ड वर्षांच्या मुलीसह महिलेनं आत्महत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय. ऋतिका पटेल असं या महिलेचं नाव आहे.
कांदिवलीतील शंकर नगर भागात इमारतीच्या १८ व्या मजल्यावरुन ऋतिका पटेल या महिलेनं आपल्या मुलीसह उडी मारली. ‘जेनी’ ही अवघ्या दीड वर्षांची चिमुरडीचा या घटनेत नाहक बळी गेलाय. या दोघींनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर मृत घोषित करण्यात आलंय.
मात्र, ऋतिकानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं यामागचं कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही.
First Published: Monday, October 22, 2012, 19:08