३० हजार जणांनी सिग्नल तोडले, ४२ लाखांचा दंड, 30 thousand people break the traffic rules

३० हजार जणांनी सिग्नल तोडले, ४२ लाखांचा दंड

३० हजार जणांनी सिग्नल तोडले, ४२ लाखांचा दंड

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
रस्त्यावर चालताना वाहतूक नियमांचे पालन करणे अतिशय आवश्यक असले, तरीही नागपुरात मात्र मोठ्या प्रमाणात याचे उल्लंघन होण्याचे प्रकार होत आहेत.

यात सिग्नल तोडण्याचे प्रमाण सर्वात जास्त असून १ जानेवारी २०१३ ते ३१ मार्च २०१४ - या १५ महिनाच्या कालखंडात थोडे-थोडके नव्हे तर तब्बल ३०,१२३ वाहन चालकांनी नागपुरातील विविध रस्त्यांवर सिग्नल तोडले आहेत.

नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेंतर्गत येणाऱ्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, इंदोरा आणि एमआयडीसी विभागात हि कारवाई झाली. या सिग्नल तोडणाऱ्यांकडून एकूण ४२,७१,६०० रुपे इतका दंड वसूल केला गेला.
माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रांवरून हि बाब उघडकीस आली असून एकीकडे वाहतूक पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप लागत असतानाच, दुसरीकडे मात्र सर्व साधारण नागरिक देखील वाहतूक नियमांचे पालन करीत नसल्याचे दुर्दैवी चित्र सध्या बघायला मिळत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 10, 2014, 21:19


comments powered by Disqus