कारंजा- नागपूर हायवेवर अपघात, १३ ठार Accident on Karanja- Nagpur Highway

कारंजा- नागपूर हायवेवर अपघात, १३ ठार

कारंजा- नागपूर हायवेवर अपघात, १३ ठार
www.24taas.com, कारंजा

यवतमाळमधील कारंजा-नागपूर हायवेवर ऍपेची कंटेनरला धडक होऊन झालेल्या अपघातात १३ जण जागीच ठार झाले, तर १९ जण जखमी झाले आहेत.

वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव येथील सोमनाथ महाराजांकडे नवस फेडण्यासाठी जात असलेल्या भाविकांच्या गाडीची कंटेनरला धडक होऊन हा अपघात झाला. करंजा-नागपूर हाय वेवर दुपारी पावणेचारच्या सुमारास ही घटना घडली. ऍपेमधून प्रवास करणारे रिसोड येथील रहिवासी होतील. नेर तालुक्यातील खरड गावाजवळ चालकाचा ताबा सुटून त्यांची गाडी समोर उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकली.


या धडकेमध्ये गाडीतील १३ जण जागीच ठार झाले. यामध्ये दहा पुरुष व तीन स्त्रियांचा समावेश आहे. जखमींवर वर्धा व यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

First Published: Wednesday, April 17, 2013, 21:05


comments powered by Disqus