अकोल्या संतप्त जमावाकडून गुंडाची हत्या, akola mob killed youngster

अकोल्यात संतप्त जमावाकडून गुंडाची हत्या

अकोल्यात संतप्त जमावाकडून गुंडाची हत्या
www.24taas.com, अकोला
नागपूरनंतर आता अकोल्यात संतप्त जमावाकडून युवकाची हत्या झाल्याची खळबळजनक घटना घ़डलीय. गरबा रास खेळणा-या महिलांची छेड काढल्यानं संतप्त जमावान योगेश चव्हाण या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकाला संतप्त जमावानं जबर मारहाण केल्यानं यात त्याचा मृत्यू झाला.

योगेश आणि उमेश हे गोघे भाऊ नवरात्रीच्या गरबा रासमध्ये येऊन रोज महिलांची छेड काढायचे. यापूर्वीही जमावानं त्यांना पक़डण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ते पळ काढण्यात यशस्वी झाले होते. मात्र काल रात्री या दोघांनी अकोल्यातील जुने शहरातल्या गाडगेनगर भागात पुन्हा महिलांची छेड काढली.
त्यामुळं संतप्त जमावानं त्यांच्यावर हल्ला चढवला. यातून उमेश चव्हाण यानं पळ काढला. मात्र योगेश जमावाच्या कचाट्यात सापडल्यानं त्याला बेदम मारहाण करण्यात आली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आलीय. मात्र या घटनेच्या निमित्तानं पोलीस सुरक्षा आणि त्याविषयी समाजाच्या बदलेल्या मानसिकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.

First Published: Monday, October 22, 2012, 18:32


comments powered by Disqus