Last Updated: Monday, February 17, 2014, 13:53
अरविंद केजरीवाल यांना अण्णा हजारे यांनी खडे बोल सुनावले आहेत. आपचे नेते अरविंद केजरीवाल यांना देशापेक्षा सत्ता जास्त प्रिय असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
अण्णांनी नागपूरमध्ये बोलतांना अरविंद केजरीवाल यांच्यावर ही टीका केली आहे.
देशासाठी अतिशय महत्वाचं जनलोकपाल विधेयक कसं मंजूर करून घेता येईल, यावर अरविंद केजरीवाल यांनी लक्ष केंद्रीत करण्याची गरज होती.
तसेच विधेयकात काही कमतरता होती. तर यावर सर्वांनी बसून चर्चा करण्याची गरज होती, तसं झालं नाही, यावरून अरविंद केजरीवाल यांना देश आणि समाजापेक्षा सत्ता महत्वाची वाटते, असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
अण्णा हजारे यांनी आधीपासून अरविंद केजरीवाल यांना राजकारणात उतरण्यास विरोध केला होता. दरम्यान, मेधा पाटकरही आपकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, February 17, 2014, 13:53