अखेर जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत दाखल!, anti-superstition bill in Assembly

अखेर जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत दाखल!

अखेर जादूटोणाविरोधी विधेयक विधानसभेत दाखल!
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

जादूटोणाविरोधी विधेयकाला आज अखेर मुहूर्त मिळालाय. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी हे विधेयक आज (बुधवारी) विधानसभेत मांडलंय. आता या विधेयकावर चर्चा सुरु झालीय.

या अधिवेशनातच जादूटोणाविरोधी विधेयक मंजूर करून घेण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांनी संपूर्ण ताकद पणाला लावलीय. परंतु शिवसेना-भाजप युतीचा या विधेयकाला असलेला विरोध कायम आहे. या विधेयकामध्ये अनेक त्रुटी असल्याचा आक्षेप शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी घेतलाय. तर विरोधकांनी सांगितलेल्या दुरूस्ती स्वीकारा, अन्यथा विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.

त्यामुळे हे विधेयक या अधिवेशनातच मंजूर होणार का? याबाबत शंकाच आहे. विधेयक संमत झाले तरी ते एकमताने होणार की बहुमताने, याकडेही आता सर्वांचं लक्ष लागलंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, December 11, 2013, 21:38


comments powered by Disqus