Last Updated: Thursday, February 14, 2013, 18:06
www.24taas.com, नागपूरनागपुरात भारतीय विद्यार्थी सेनेच्या घोषणेचा त्यांच्याच कृतीमुळे फज्जा उडाला. नेमकं झालं तरी काय? त्यामुळे विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्याला जेलची हवा खावी लागली.
नागपुरात विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी गाजावाजा करत व्हेलेंटाईन-डेच्या दिवशी एकत्र फिरणा-या जोडप्यांचं जागीच लग्न लावून देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी जोरदार तयारीही करण्यात आली. मात्र शहरातल्या कुठल्याच भागात एकही प्रेमी जोडपं सापडलं नाही. त्यामुळे विद्यार्थी सेनेच्या घोषणेचा चांगलाच फज्जा उडाला. मात्र आपला शब्द खाली पडू नये म्हणून विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते प्रशांत जनबंधूचंच लग्न घाईघाईनं लावून देण्यात आलं. मात्र प्रशांत हा विद्यार्थी सेनेचा कार्यकर्ताच लग्नाची तयारी करत असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे विद्यार्थी सेनेचं पितळ उघड पडलंय.
आपली बनवाबनवी उघड होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांनी हे लग्न अगदी घाईघाईत उरकलं. मात्र कायदा हातात घेऊन लग्न लावल्यामुळे भारतीय विद्यार्थी सेनेचा शहरप्रमुख शरद सरोदेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. घोषणेचा फज्जा उडू नये म्हणून कार्यकर्त्याचंच लग्न भारतीय विद्यार्थी सेनेनं लावली... मात्र हा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला.
First Published: Thursday, February 14, 2013, 18:06