दिसाल `व्ही- डे`ला एकत्र, तर गळ्यात पडेल मंगळसूत्र! Shiv Sena aggressive on V-Day

दिसाल `व्ही- डे`ला एकत्र, तर गळ्यात पडेल मंगळसूत्र!

दिसाल `व्ही- डे`ला एकत्र, तर गळ्यात पडेल मंगळसूत्र!
www.24taas.com, नागपूर

१४ फेब्रुवारीला असणाऱ्या व्हेलेंटाइन डेबद्दल तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र व्हेलेंटाईन डेचा जल्लोष सुरु होण्याआधीच नागपूरात शिवसेनाच्या भारतीय विद्यार्थी सेनेने बगिच्यात बसलेल्या जोडप्यांना पळवून लावलंय.

शहरातील सातपुडा बाल उद्यानात बसलेल्या जोडप्यांना सेनेकडून दमदाटी करण्यात आली. व्हेलेंटाईन-डे संस्कृतीचा निषेधही यावेळी करण्यात आला. तसंच शुभेच्छा पत्रिकांचे दहन सुद्धा या वेळी करण्यात आलं. व्हालेंटाईन-डेच्या दिवशी भारतीय विद्यार्थी सेना शहरात वाहनं घेऊन फिरणार असून हा दिवस साजरा करणाऱ्या जोडप्यांचं तेथेच लग्न लावून देण्यात येणार असल्याचं विद्यार्थीसेनेकडून सांगण्यात आलंय.

विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते प्रेमी जोडप्यांना दमदाटी करत असतानाच तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती.

First Published: Wednesday, February 13, 2013, 17:40


comments powered by Disqus