भोंदूबाबानं पळवलं नाही नवऱ्यानंच विकलं?Bhondu Baba taken off his devotee`s wife

भोंदूबाबानं पळवलं नाही नवऱ्यानंच विकलं?

भोंदूबाबानं पळवलं नाही नवऱ्यानंच विकलं?
www.24taas.com, झी मीडिया, बुलडाणा

नाशिकमध्ये आपल्याच शिष्याची बायको पळवून नेणाऱ्या हरिओम बाबा प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. बाबानं आपल्याला पळवलं नाही तर पती मंगेश तनपुरेच्या भीतीपोटी कालिया बाबाच्या घरी सुखरूप असल्याची कबुली संबंधीत महिलेनं दिलीय. पतीनं १५ लाख रुपयांना आपल्याला नाशिकमधील एका महिलेला विकलं असल्याची धक्कादयक माहिती तिनं दिलीय. तर भोंदूबाबाचीच फूस असल्यानं आपल्यावर आरोप होत असल्याचा दावा मंगेशनं केलाय.

बुलडाणा जिल्ह्यातल्या काल्या उर्फ दिलीपकुमार जमुना प्रसाद तिवारी या भोंदूबाबाच्या विरोधात नाशिकमध्ये पत्नीला पळवून नेल्याची तक्रार या बाबाच्या शिष्यानं केली होती. या तक्रारीला आता नवं वळणं मिळालंय. ही विवाहित महिला अचानक बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये आली आणि तीनं पोलिसांसमोर आपली बाजू मांडली.

वस्तुस्थिती सांगण्यासाठी बुलडाणा पोलिसांत गेल्यानंतर पोलिसांनी आरोपींसारखी वागणूक आल्याला दिल्याचा आरोप तीनं केला. पती मंगेश तनपुरे आणि कल्पना पगारे नामक महिलेचा मुलींना विकण्याचा व्यवसाय आहे आणि याची सीबीआय चौकशी करायला हवी अशी मागणी तीनं केली. तर भोंदूबाबाची फूस असल्यानंच आपली पत्नी आरोप करत असल्याचा दावा मंगेश तानपुरेनं केलाय.

संबंधित महिला आणि तिच्या पतीनं केलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळं या प्रकरणाला नवं वळणं मिळालंय. त्यामुळं या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण झाला तरच याची सत्यता बाहेर येऊ शकेल.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 18, 2013, 20:57


comments powered by Disqus