कोल्हापुरात गरोदर महिलांना फसवणाऱ्या भोंदूला अटक

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 18:17

कोल्हापूरमध्ये एका भोंदूबाबाचे भांडाफोड करण्यात आले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. दीड महिन्याच्या गरोदर महिलांना झाडपाल्याचे आयुर्वेदिक औषध देऊन फसवणूक करण्याचा या भोंदूचा डाव होता.

स्त्री गर्भाचं पुरुष गर्भात रुपांतर करणाऱ्या भोंदूबाबाला अटक

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 19:11

स्त्री गर्भाचं पुरूष गर्भात रूपांतर करून देतो असं सांगून लुबाडणाऱ्या शंकर कुंभार या भोंदूबाबाला रंगेहात पकडण्यात आलंय.

चिमुरडीला जिवंत पुरणाऱ्या भोंदूबाबाला अटक

Last Updated: Friday, February 28, 2014, 12:06

कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील झुंजरवाड येथे मंगळवारी रात्री १ वाजता ७ वर्षीय मुलीवर जीवघेणा अघोरी प्रकार केल्याप्रकरणी भोंदूबाबासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.

भोंदूबाबाचा मुलीला जाळण्याचा प्रयत्न

Last Updated: Friday, February 28, 2014, 11:56

कर्नाटकमधील बेळगाव जिल्ह्यातील झुंजरवाड येथे मंगळवारी रात्री १ वाजता ७ वर्षीय मुलीवर जीवघेणा अघोरी प्रकार एका भोंदूबाबाने केल्याचे उघड झाले आहे.

भोंदूबाबानं पळवलं नाही नवऱ्यानंच विकलं?

Last Updated: Monday, November 18, 2013, 20:57

नाशिकमध्ये आपल्याच शिष्याची बायको पळवून नेणाऱ्या हरिओम बाबा प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. बाबानं आपल्याला पळवलं नाही तर पती मंगेश तनपुरेच्या भीतीपोटी कालिया बाबाच्या घरी सुखरूप असल्याची कबुली संबंधीत महिलेनं दिलीय. पतीनं १५ लाख रुपयांना आपल्याला नाशिकमधील एका महिलेला विकलं असल्याची धक्कादयक माहिती तिनं दिलीय. तर भोंदूबाबाचीच फूस असल्यानं आपल्यावर आरोप होत असल्याचा दावा मंगेशनं केलाय.

गुप्त धनाचं आमिष दाखवून २ भोंदुबाबांनी फसवलं

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 16:57

देवळा तालुक्यातल्या हरी ओम बाबाचे काळे कारनामे चर्चेत असताना नाशिकमध्ये आणखी २ भोंदुबाबांचे प्रताप समोर आलेत. गुप्त धनाचं आमिष दाखवून जवळपास साडेचार लाखांना फसवलं गेल्याचं समोर आलंय.

भक्ताच्या नववधूसोबत भोंदूबाबा फरार!

Last Updated: Thursday, November 7, 2013, 14:24

नाशिकच्या देवळा पोलीस ठाण्यात भोंदूबाबा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे एका भक्ताचं लग्न जमत नसताना त्याने भक्ताचं लग्न नोंदणीपद्धतीने लावून दिलं आणि नववधूला घेऊन बाबा फरार झालाय.

भोंदूबाबाने केली ८१ हजारांची फसवणूक

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 22:08

भोंदुबाबाच्या उपचारामुळे नागपुरात एक महिलेचा कॅन्सर बळावल्याचा प्रकार `झी मीडिया`नं नुकताच उघडकीस आणलाय. आता त्यापाठोपाठ नागपुरात आणखी एका भोंदूबाबानं एका युवतीला 81 हजार रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय.

‘भोंदू’च्या आहारी जाऊन गर्भवती महिलेला मारहाण

Last Updated: Saturday, April 13, 2013, 11:51

एका भोंदू बाबाच्या सांगण्यावरून सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण केल्याची तक्रारक एका विवाहितेनं पोलिसांत नोंदवलीय. पोटात मुलीचा गर्भ वाढत असल्याने एका बाबाच्या सांगण्यावरून सासरच्या मंडळींनी गर्भपात केल्याचा आरोप या महिलेनं केलाय.

भोंदूबाबापासून सावधान!

Last Updated: Thursday, April 11, 2013, 07:54

समस्या सोडविण्याची बतावणी करून भोळ्याभाबड्या महिला आणि पुरूष भक्तांना फसविणा-या दोन भोंदू बाबांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केलीय.

नैराश्येवर उपाय भोंदूबाबा नाही!

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 22:45

पुण्यात नैराश्यानं ग्रासलेल्या सुशिक्षित तरुणीला भोंदुगिरीचा चांगलाच फटका बसलाय. दैवी शक्तीच्या जोरावर सगळ्या समस्या सोडवतो, असं सांगणाऱ्या बंगाली बाबानं तरुणीकडून पैसे लुबाडले आणि तिची फसवणूक केली.

भोंदूबाबाचा पर्दाफाश

Last Updated: Thursday, December 8, 2011, 06:24

आपल्याला दृष्टांत झाला आणि त्यामुळे दैवी शक्ती प्राप्त झाल्याची बतावणी करत अचानकपणे हा दिलीप गजभिये बेडीवाला बाबा बनला. त्यानं आपल्या राहत्या घरी छोटेखानी मंदिर बनवलं. आपलं व्यवस्थीत आसनही तयार केलं.

संधी'साधू' गजाआड

Last Updated: Sunday, November 6, 2011, 06:48

मुलींना फसवणा-या एका भोंदूबाबाला अटक करण्यात आलीये. कुठलाही आजार बरा करून देतो, असं सांगून हा भोंदूबाबा मुली आणि महिलांना त्याच्या घरी बोलवायचा आणि त्यांच्यावर बलात्कार करायचा. या चोवीस वर्षाच्या इमामुद्दीन ठाकूरला पोलिसांनी अटक केली.