नागपूरमध्ये ५ वर्षीय चिमुकलीला बसनं चिरडलंBus Killed 5 years girl in Nagpur

नागपूरमध्ये ५ वर्षीय चिमुकलीला बसनं चिरडलं

नागपूरमध्ये ५ वर्षीय चिमुकलीला बसनं चिरडलं
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

नागपूरकर आज हळहळले... आग्याराम देवी चौकामध्ये आज एका चिमुकलीचा अपघातात मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार आग्याराम देवी चौकामध्ये एका बसनं गुंजन पारपल्लीवार या पाच वर्षीय चिमुकलीला चिरडलं. या अपघातात गुंजनचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून ते पुढचा तपास करत आहेत.

आग्याराम देवी चौकातून बसेस बस स्टँडला जात असतात. नेहमीच या चौकात ट्रॅफिक असतं. कॉटन मार्केट रोड असल्यामुळं ट्रक आणि इतर वाहनांचीही गर्दी कायम या रस्त्यावर असते. अशात चिमुकल्यांकडील दुर्लक्ष अशा दुर्घटनांना आमंत्रण देतात.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, March 19, 2014, 14:57


comments powered by Disqus