Last Updated: Thursday, December 12, 2013, 11:34
www.24taas.com, झी मीडिया, नागपूरसध्या सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन माझ्यासाठी अखेरचे अधिवेशन आहे, अशी कबुली सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी येथे व्यक्त केली. भुजबळ यांनी अनौपचारिक माहिती काल पत्रकारांशी बोलताना दिली.
राज्याच्या राजकारणात सुमारे ३५ ते ४० वर्षे सक्रिय राहिल्यानंतर भुजबळ यांनी लोकसभेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सुयोग निवासस्थानी भुजबळांनी पत्रकारांशी भेट घेतली त्यावेळी पुढील वर्षात होणा-या लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे रहाणार असल्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
या आधी शरद पवार यांनी भुजबळांवर नवी संधी सोपविली जाईल, असे संकेत काही महिन्यांपूर्वी दिले होते. त्यानंतर भुजबळ यांनी हे वक्तव्य केल्याने ते केंद्रात जाण्याचे स्पष्ट होत आहे. तर नागपूर अधिवेशन हे भुजबळ यांच्या राजकीय वाटचालीतील शेवटचे अधिवेशन असणार आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यासाठी हिवाळी अधिवेशन हे भावनिक दृष्ट्या महत्वाचं असेल.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Thursday, December 12, 2013, 11:23