कॉम्युटरचा स्फोट, विद्यार्थ्याला गमवावा लागला हात, Computer blast in Nagpur

कॉम्युटरचा स्फोट, विद्यार्थ्याला गमवावा लागला हात

कॉम्युटरचा स्फोट, विद्यार्थ्याला गमवावा लागला हात
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

एखादा चीनी बनावटीचा मोबाइल किंवा खेळण्याचा स्फोट होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. मात्र आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झालेला संगणकही सुरक्षित नसल्याचं एका घटनेनं स्पष्ट झालंय. नागपूरात घडलेल्या या घटनेमध्ये एक तरुण गंभीर जखमी झालाय...

मख्खनलाल शिवरे... 20 वर्षांचा हा तरुण सध्या नागपूरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतोय... तो संगणकावर काम करत असताना तो गंभीर जखमी झालाय. बारावीची परीक्षा झाल्यानंतर कॉम्प्युटर शिकण्यासाठी मख्खननं सिग्मा इंफोटेक या एका स्थानिक संस्थेत नाव घातलं. गेल्या आठवड्यात वर्गात प्रॅक्टिस करत असताना अचानक कॉम्प्युटरचा भयानक स्फोट झाला....

हा स्फोट इतका भयानक होता, की मख्खनच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्याच्या शरीरावर अन्यत्रही ब-याच जखमा झाल्या. त्याच्या वर्गमित्रांनी त्याला स्थानिक रुग्णालयात दाखल केलं. मख्खनच्या हाताला झालेली जखम चिघळल्यानं त्याला आता आपला हातच गमवावा लागणार आहे. इलेक्ट्रोनिक उपकरणांमुळे केवळ शरिराच्या बाह्य भागावरच नव्हे, तर, अंतर्गत जखमाही झाल्याचं डॉक्टर सांगतात. कॉम्प्युटरमधल्या अतिमहत्त्वाच्या भागांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष कराल, तर मख्खनच्या जागी उद्या तुम्हीही असू शकाल असा इशारा संगणकतज्ज्ञ देतायत...

First Published: Thursday, April 25, 2013, 16:29


comments powered by Disqus