बुलढाण्याला पाणीपुरवठा करणारं धरण कोरडं Dam providing water to Buldhana Dry out

बुलढाण्याला पाणीपुरवठा करणारं धरण कोरडं

बुलढाण्याला पाणीपुरवठा करणारं धरण कोरडं
www.24taas.com, बुलढाणा

बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारं येळगाव धरण 100 टक्के कोरडं झाल्यानं डिसेंबर महिन्यातच शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागलीय. शहरात 20 ते 22 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे महिला वर्गावर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलीय.

बुलढाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यानं अनेक तालुक्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवतीय. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणारं येळगाव धरण 100 टक्के कोरडं झालय. त्यामुळे पाणीटंचाईचं संकट उभं राहिलंय. पर्याय म्हणून बुलढाणा शहराला पेनटाकळी धरणातून पाणीपुरवठा केला जातोय. मात्र हे धरण 60 कि.मी अंतरावर आहे. शिवाय पाईपलाईन छोटी असल्यानं 20 ते 22 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय.

पाणीटंचाईमुळे महिलांना पाण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागतीय. मोल मजुरी करणा-या महिलांना याचा मोठ्या प्रमाणात फटक बसलाय. दुसरीकडे पाण्याबाबत लोकप्रतिनिधी काहीही बोलायला तयार नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय.

विशेष म्हणजे पेनटाकळी धरणातही उपलब्ध असलेला पाणीसाठा अत्यल्प आहे. भूगर्भातली पाण्याची पातळीही खालावलीय. डिसेंबर महिन्यातच अशी परिस्थिती तर उन्हाळा कसा निघणार हीच चिंता शहरवासियांना भेडसावत आहे.

First Published: Wednesday, December 26, 2012, 20:03

comments powered by Disqus