सुदर्शन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, Ex-RSS chief KS Sudarshan passes away

सुदर्शन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

सुदर्शन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
www.24taas.com,नागपूर

माजी सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल त्यांतं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

गेले काही दिवस ते रायपुरात होते. पहाटे त्यांनी संघाची प्रभात शाखा घेतली. शाखा विसर्जन करुन ते फिरायला गेले. यावेळी प्राणायाम करीत असताना त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचं निधन झालं. नागपूरात त्यांच पार्शिव आणण्यात आलंय. आज त्यांच्या पार्थिवावर नागपुरात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. दुपारी तीन वाजता त्यांच्या पार्थिवावर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे संघाचे प्रवक्ते राम माधव यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ते माजी सरसंघचालक होते. २००० ते २००९ मध्ये सरसंघचालक म्हणून त्यांनी संघाचे काम पाहिले होते. २०००मध्ये त्यांच्यावर संघाच्या सरसंघचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. सरसंघचालक होण्यापूर्वी संघाच्या महत्त्वाच्या विभागांचे प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. संघाचे शारीरिक आणि बौद्धिक या दोन्ही विभागाचे प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळणारे ते एकमेवच संघ कार्यकर्ते होते.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, राजनाथसिंह, अरुण जेटली यांनीही के. सुदर्शनजी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

First Published: Sunday, September 16, 2012, 10:29


comments powered by Disqus