Last Updated: Thursday, February 13, 2014, 23:06
www.zee24taas.com, झी मीडिया, नागपूरनागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कृषीसंबंधी कार्यक्रमात विदर्भातल्या शेतक-यांनी मोठा गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातला शेतकरी थेट उभा राहून कापसाच्या दरावरून घोषणा देऊ लागला.
यानंतर कार्यक्रमाला आलेल्या इतर शेतक-यांनीही मग जोरदार घोषणाबाजी सुरू करत मोफत वीज आणि कापसाच्या भाववाढीची मागणी केली. त्यामुळं कार्य़क्रमात आणखीनंच गोंधळ वाढला.
मुख्यमंत्र्यांना आपले भाषण थांबवावे लागले. अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. पोलिसांनी राडा करणाऱ्या शेतकऱ्यांना कार्यक्रमातून बाहेर काढले.
मुख्यमंत्र्यांनी मात्र वीज दरात कपात केल्याचं सांगितलं. मात्र कापसाच्या भाववाढीवर मौन बाळगलं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, February 13, 2014, 23:06