सिंडिकेट बँकेत आग, संशयाचा धूर! Fire in Bank, people Suspects management

सिंडिकेट बँकेत आग, संशयाचा धूर!

सिंडिकेट बँकेत आग, संशयाचा धूर!
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

नागपूरच्या फ्रेंड्स कॉलनी, काटोल रोड परिसरातल्या सिंडीकेट बँकेत आज सकाळी आग लागली होती. आगीचं नेमकं कारण कळू शकलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जातेय.

आगीत बँकेतली महत्वाची कागदपत्रं, टेबल-खुर्च्या, संगणक आणि बँकेत लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे जळून खाक झालेत. या बँकेत सुमारे १५,००० खातेधारक असून बँकेचे रोजचे आर्थिक व्यवहार सुमारे ५ कोटीचे आहेत.मात्र तरी देखील बँकेत रात्रीच्या वेळी एकही सुरक्षारक्षक नसल्याची तक्रार घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि खातेधारकांनी केलीय.

इतकंच काय तर आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि पोलीस पोहचल्यानंतर सर्वात शेवटी बँकेचे अधिकारी आल्याचे आरोप या खातेधारकांनी केलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, June 3, 2013, 18:06


comments powered by Disqus