जुन्नरमध्ये RTI कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 12:44

जुन्नरमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याचा संशयास्पद मृत्यू झालाय. विलास बारावकर असं आरटीआय कार्यकर्त्याचं नाव आहे. ते चाकणमधील रहिवासी होते. चाकणच्या राजगुरू परिसरातल्या सहकारी संस्थांचे घोटाळे त्यांनी उघडकीस आणले होते. मात्र ही आत्महत्या आहे की हत्या याबाबत अस्पष्टता आहे.

बेपत्ता मलेशियन विमान तालिबानमध्य़े?

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 14:16

बेपत्ता मलेशियन विमान तालिबानच्या हद्दीत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसा संशय अधिक बळावला आहे. शुक्रवारी ८ मार्चपासून मलेशियाचे २३९ प्रवासी असलेले विमान बेपत्ता आहे. त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे विमान समुद्रात कोसळ्याचे सांगण्यात आले होते. मात्र, शोध मोहीमेत त्याचा ठावठिकाणा लागेला नाही.

बेपत्ता विमानाचा शोध ११ देशांमध्ये, पायलटच्या भूमिकेवर संशय

Last Updated: Monday, March 17, 2014, 09:31

मलेशियातील बेपत्ता विमानाचा शोध आता ११ देशांमध्ये घेतला जातोय. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानाच्या पायलटच्या भूमिकेवर संशय असून त्याच्या घरी सापडलेल्या सिम्युलेटरची चाचणीही घेतली जातेय. विमानाच्या पायलटला रडारपासून कसं वाचायचं हे माहित होतं. त्यामुळं विमान हायजॅक झालं का? दहशतवाद्यांचा यात काही हात आहे का? या सर्व शक्यतांचा तपास मलेशिया तपास अधिकारी करत आहेत.

`ती` सैन्याची दिल्लीकडे कूच नव्हतीच - चौधरी

Last Updated: Friday, February 21, 2014, 13:15

दोन वर्षांपूर्वी १५ आणि १६ जानेवारीला भारतीय लष्कराच्या तुकडया नवी दिल्लीकडे कूच करत असल्याच्या मीडियात आलेल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या होत्या, असा खुलासा भारतीय लष्कराच्या `मिलिटरी ऑपरेशन`चे माजी डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल एल. के. चौधरी यांनी `झी मिडिया`शी बोलताना केलाय.

ऑस्कर विजेत्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू

Last Updated: Monday, February 3, 2014, 20:25

ऑस्कर विजेता अभिनेता फिलिप सीमोर हॉफमॅन यांचा संशयास्पद मृत्यू झालाय. मॅनहॅटन येथील वेस्ट व्हिलेज येथे हॉफमॅन यांच्या राहत्या घरातील बाथरूममध्ये त्याचा मृतदेह पोलिसांना आढळला.

अनैतिक संबंधातून पिंपरीत ठेकेदाराची हत्या

Last Updated: Sunday, December 29, 2013, 20:14

पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना थांबता थांबत नाहीयेत. शहरात आज सकाळी एका ठेकेदाराची हत्या करण्यात आलीय. धक्कादायक म्हणजे त्याच्याच कामगाराने त्याची हत्या केलीय. ही हत्या अनैतिक संबंधांच्या संशयावरुन झाल्याची माहिती मिळतेय.

पाटणा बॉम्बस्फोट : मुख्य संशयित आरोपी तारिकचा मृत्यू

Last Updated: Friday, November 1, 2013, 16:32

पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं बॉम्बस्फोटाच्या चौकशीला मोठा धक्का बसलाय.

पाटणा स्फोट: १३ संशयीत ताब्यात, इंडियन मुजाहिद्दीनवर संशय

Last Updated: Monday, October 28, 2013, 10:14

नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीआधी पाटणामध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा हात असल्याचा संशय आहे.

डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणी संशयित ताब्यात!

Last Updated: Thursday, September 5, 2013, 13:14

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी जारी केलेल्या दुसऱ्या रेखाचित्राशी मिळता-जुळता चेहरा असलेल्या असिफ नावाच्या एका इसमास शिर्डी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांनी साईबाबा मंदिराच्या गेट क्रमांक- ४ समोरुन ताब्यात घेतलंय.

... हा आहे दाभोलकरांच्या हत्येतील दुसरा आरोपी!

Last Updated: Monday, September 2, 2013, 17:55

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला उद्या मंगळवारी दोन आठवडे पूर्ण होत आहेत. पण, अजूनही पुणे पोलिसांना ना या हत्येमागच्या कारणांचा उलगडा झालाय ना मारेकऱ्यांचा...

जिया संशयी, एका एसएमएसने केला घात!

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 17:10

अभिनेत्री जिया खान ही संशयी होती याच संशयामुळे तिचे आणि अभिनेता आदित्य पांचोली याचा मुलगा सूरजमध्ये भांडण झाले. या भांडणाचे कारण होतं एक एसएमएस....

सिंडिकेट बँकेत आग, संशयाचा धूर!

Last Updated: Monday, June 3, 2013, 18:06

नागपूरच्या फ्रेंड्स कॉलनी, काटोल रोड परिसरातल्या सिंडीकेट बँकेत आज सकाळी आग लागली होती. आगीचं नेमकं कारण कळू शकलं नसलं तरी शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जातेय.

मुंबई किनाऱ्यावर संशयास्पद जहाज

Last Updated: Thursday, April 25, 2013, 22:02

मुंबईच्या समुद्र किना-यापासून अवघ्या २२ किलोमीटर अंतरावर समुद्रात एम. एस. व्ही . युसुफी हे जहाज होतं. एका फोन कॉलमुळेच ते जहाज नौदलाच्या हाती लागलं आणि त्यातील बकऱ्यांचं रहस्य समोर आलं.

बोस्टन बॉम्बस्फोट: संशयिताला मृत्यूदंडाची शिक्षा?

Last Updated: Tuesday, April 23, 2013, 12:58

बोस्टन बॉम्बस्फोटाचा संशयित आरोपी जोखर सरनाएवला मृत्यूदंडाची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमेरिकीत घातपात करण्यासाठी हे बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप त्यावर लावण्यात आला आहे.

ठाण्यात शोध दहा संशयीतांचा

Last Updated: Monday, April 22, 2013, 16:23

ठाण्यातील घोडबंदर रोडवरच्या ग्रीन हिल इमारतीत मध्यरात्री दहा संशयित उतरल्याची माहिती तिथल्या रखवालदारांनी पोलिसांना दिलीये.

बोस्टन बॉम्बस्फोट : एक संशयित ठार, दुसरा अटकेत

Last Updated: Saturday, April 20, 2013, 16:36

बोस्टन बॉम्बस्फोट प्रकरणी अमेरिकेन पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. बॉम्बस्फोटा दरम्यान संशयित म्हणून नजरेत आलेल्य दोन तरुणांपैकी हा एक तरुण हे. तर दुसऱ्याचा संशयित तरुणाचा पोलीस चकमकीत मृत्यू झालाय.

दहशतवादी पाकिस्तानी असल्याचा संशय- सुशीलकुमार

Last Updated: Thursday, March 14, 2013, 13:47

दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पाच जवानांना श्रद्धांजलीवेळी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे गैरहजर असल्यामुळं विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला.

शेतकरी नेते एकवटले; अश्रू झाले अनावर!

Last Updated: Saturday, November 17, 2012, 16:02

ऊस आंदोलनादरम्यान सांगलीत झालेल्या पोलीस गोळीबार प्रकरणी चंद्रकांत नलावडे या शेतकऱ्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केलाय.

'विदूषी'चा खून की आत्महत्या?

Last Updated: Wednesday, October 24, 2012, 15:38

मुंबईतमध्ये अंधेरी भागात मॉडेलिंग क्षेत्रातील एका तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडालीय.

पुणे बॉम्बस्फोट : गोव्यात संशयिताला अटक

Last Updated: Saturday, September 8, 2012, 11:59

नुकत्याच झालेल्या पुणे बॉम्बस्फोट प्रकरणी गोव्यात एका संशयितला अटक करण्यात आली आहे. संशयित आरोपीचं नाव अफजल खान असं असल्याचं समजतंय.

नांदेडमधील संशयित आतंकवादी बंगळुरूत अटक

Last Updated: Monday, September 3, 2012, 10:16

नांदेड जिल्ह्यातल्या आणखी एका संशयित दहशतवाद्याला बंगळुरूत अटक करण्यात आली आहे. महम्मद अक्रम देगलूरचा रहिवासी असून एटीएसनं त्याला 29 ऑगस्टला अटक केली.

अनुराधा बाली ऊर्फ फिजाचा संशयास्पद मृत्यू

Last Updated: Monday, August 6, 2012, 14:01

वादग्रस्त अनुराधा बाली ऊर्फ फिजाचा मोहालीच्या राहत्या घरी दुर्दैवी अंत झालाय. फिजाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आलाय. तिचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता.

मुंबईत दोन अर्भकांची हत्या, भ्रूणहत्या ?

Last Updated: Friday, June 8, 2012, 12:25

मुंबईच्या कुर्ला भागात महापालिका शाळेजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात दोन भ्रूण सापडली आहेत. एक ४ महिन्यांचं आणि दुसरं दोन महिन्याचं मृत भ्रूण सापडल्यानं खळबळ उडाली आहे.

साईबाबा संस्थान कारभारवर संशय

Last Updated: Friday, April 13, 2012, 11:51

शिर्डीतील साईबाबा संस्थानचा कारभार चोख व पारदर्शी व्हावा यासाठी राज्य सरकारनं २००४ मध्ये साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची नियुक्ती केली खरी, मात्र कारभार पारदर्शी होण्याऐवजी त्याभोवती संशयाचं जाळंच निर्माण झालं. या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांनी या दानाचा वापर स्वत:ची मोबाईलची हौस भागवण्यासाठी केल्याचं समोर आले आहे.

आणखी दोन संशयित अतिरेकी ताब्यात

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 16:35

औरंगाबादपाठोपाठ बुलढाणा जिल्हातल्या चिखलीतून दोन संशयित अतिरेक्यांना काल रात्री ताब्यात घेण्यात आलंय. अकोला एटीएसनं ही कारवाई केलीय. अखिल मोहम्मद युसूफ खिलची आणि मोहम्मद जाफर या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे दोघे संशयित खांडव्याचे असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे.