पूरग्रस्तांची मंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक!, flood affected people thrown stones on minister In chandrapur

पूरग्रस्तांची मंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक!

पूरग्रस्तांची मंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक!
www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर

पूरग्रस्त भागांचा दौरा करायला गेलेल्या पालकमंत्री संजय देवतळे यांच्या ताफ्यावर संतप्त नागरिकांनी दगडफेक करण्यात आली. चंद्रपूरच्या सिस्टर कॉलनी परिसरात ही घटना घडलीय.

पूर आल्यावर १५ दिवस पालकमंत्री होते कुठे? असा संतप्त सवाल नागरिकांनी केलाय. दगडफेकीनंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. दरवर्षीच्या पूरस्थितीवर तोडगा काढण्याची नागरिकांची मागणी आहे.


दुष्काळी भागाला दिलासा
दरम्यान, दुष्काळी भागातील चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरु राहणार आहेत. वनमंत्री पतंगराव कदम यांनी ही घोषणा केलीय. चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर १६ ऑगस्टपर्यंत सुरु राहणार असल्याची माहिती त्यांनी दिलीय. त्यानंतर परिस्थिती पाहून पुढचा निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. ‘झी मीडिया’च्या वृत्तानंतर कदम यांनी ही घोषणा केलीय. सांगली जिल्हातल्या पश्चिमेला पूरस्थिती असली तरी, पूर्व भागातल्या पाच तालुक्यात अजूनही दुष्काळी परिस्थिती कायम आहे. पाण्याअभावी दुष्काळग्रस्तांची आणि चाऱ्याअभावी जनावरांची तडफड सुरु आहे. दुष्काळी तालुक्यात समाधानकारक पाऊस पडला नसतानादेखील प्रशासन चारा छावण्या बंद करत असल्याची बातमी ‘झी २४ तास’नं दाखवली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, August 4, 2013, 13:15


comments powered by Disqus