युवतीची एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या girl suicide after harassment from youth

युवतीची एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

युवतीची एकतर्फी प्रेमाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
www.24taas.com, झी मीडिया, खामगाव

खामगावमध्ये एकतर्फी प्रेमातून होणार्‍या सततच्या त्रासाला कंटाळून एका युवतीने आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना खामगाव तालुक्यातील पारखेड येथे गुरुवारी घडली. युवतीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेला युवक फरार असल्याचं सांगण्यात येत आहे.

पारखेड येथील लक्ष्मी कैलास डाबेराव, वय १९ वर्षे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. लक्ष्मीवर गावातीलच विठ्ठल शिवसिंह सोळंके हा तरुण एकतर्फी प्रेम करत होता.

लक्ष्मी विठ्ठलला भीक घालत नसल्याने विठ्ठल तिची वारंवार छेडछाड करुन अपमानित करत होता.

नुकतेच लक्ष्मीला लग्नासाठी एक स्थळही आले होते. डाबेराव कुटुंबाने तिचे लग्न ठरविण्यासाठी पाहुण्यांना आज शुक्रवारी बोलावले हाते.

लग्न ठरणार असल्याचे समजल्यानंतर कैलासने लक्ष्मीला लग्न तोडण्याची धमकी दिली आणि गावातील लोकांसमोर तसेच कुटुंबासमोर अपमानित केले होते.

विठ्ठलच्या या एकतर्फी प्रेमातून होणार्‍या त्रासाला कंटाळून अखेर गुरुवारी रात्री लक्ष्मीने घरातील छताला गळफास घेतला. लग्नानंतर सुखी आयुष्याची स्वप्ने पाहण्यार्‍या लक्ष्मीने आत्महत्या केल्याचे सकाळी घरच्या मंडळींच्या लक्षात आलं.

लग्न तोडण्याची धमकी दिल्याने लक्ष्मीने जीवनयात्रा संपविल्याची तक्रार तिचा भाऊ पहाडसिंह कैलास डाबेराव याने आज शुक्रवारी खामगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये नोंदविली. या तक्रारीवरून पोलिसांनी विठ्ठल शिवसिंह सोळंके या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 29, 2014, 19:25


comments powered by Disqus