Last Updated: Wednesday, November 6, 2013, 14:47
www.24taas.com, झी मीडिया, नागपूरनागरिकांना महाराष्ट्र सरकारच्या कारभारामुळे चिंतेत टाकलंय. २१ जून २०१३ मध्ये मंत्रालयाला लागलेल्या आगित मंत्रालयातील अनेक महत्वाच्या फाईली जळून खाक झाल्या होत्या.
माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहिती नुसार जानेवारी २०१३ मध्ये राज्य सरकारने ६३३४५ फाईल्स जळाल्याचे स्पष्ट केले होतं. मात्र ९ महिन्या नंतर राज्य सरकारनं त्यात २३३५४ फाईल्सची भर टाकत ८६७०३ जाळ्याची माहिती दिलीये. त्यामुळे भष्ट्राचाराची प्रकाणं दाबण्यासाठी भ्रष्ठ मंत्रांनी केलेलं हे षडयंत्र तर नाहीना अशी शंका या निमित्तानं निर्माण होऊ लागली आहे.
तर दुसरीकडे भ्रष्ट मंत्र्यांनी भ्रष्ट्राचाराच्या फाईल्स गायब करून त्या जळाल्याचा कांगावा केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Wednesday, November 6, 2013, 14:47