व्हिडिओ : हसन मुश्रीफांच्या अंगावर ओतली शाई!, Ink thrown on hasan mushrif in buldana

व्हिडिओ : हसन मुश्रीफांच्या अंगावर ओतली शाई!

<B> <font color=red>व्हिडिओ : </font></b>हसन मुश्रीफांच्या अंगावर ओतली शाई!

www.24taas.com, झी मीडिया, बुलडाणा

मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं आणि आपल्या मागण्या पूर्ण न केल्याचा जनतेच्या मनात कायम राहतो... आणि वेळ मिळाल्यास तो बाहेरही पडतो... याचंच उदाहरण आज बुलडाण्यात पाहायला मिळालं.

अपंगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना या रागाला सामोरं जावं लागलं. राष्ट्रवादीच्या अपंगांच्या सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवे यांनी हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केलं. भरसभेत त्यांनी हसन मुश्रीफ यांच्या अंगावर शाईची भरलेली बाटली ओतली. त्यामुळे सभेत एकच गोंधळ उडाला.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्यावर शाई फेकणाऱ्या राष्ट्रवादीच्या अपंगांच्या सेलचे जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून निलंबित करण्यात आलंय. अपंगांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे संतप्त झालेल्या नामदेव डोंगरदिवेनं हसन मुश्रीफ यांच्यावर शाई फेकली होती.

...या घटनेवर हसन मुश्रीफ यांनी काय प्रतिक्रिया दिलीय, पाहा...





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 26, 2013, 17:59


comments powered by Disqus