Last Updated: Friday, December 27, 2013, 12:43
कामगारमंत्री आणि बुलडाण्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर काल राष्ट्रवादीच्या अपंगांच्या सेलचा जिल्हाध्यक्ष नामदेव डोंगरदिवेनं शाई फेकल्यानंतर आज हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरमध्ये दुग्धाभिषेक घालण्यात आला. हसन मुश्रीफ यांनी झालेल्या प्रकाराबद्दल झी 24 तासकडे महाराष्ट्राची जाहीर माफी मागितलीय.