Last Updated: Saturday, May 31, 2014, 15:46
www.24taas.com, झी मीडिया, गडचिरोली गडचिरोलीच्या आलापल्ली भागात काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद सदस्याची नक्षल्यांनी केलेल्या हत्येला आठवडाही उलटत नाही तोच एटापल्ली भागात नक्षलींनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची घरात घुसून हत्या केलीय.
घिसू मट्टामी असं हत्या झालेल्या नेत्याचं नाव असून ते काँग्रेसच्या एटापल्ली पंचायत समितीच्या सभापती लता मट्टामी यांचे पती आहेत. घिसू आणि पंचायत समिती सभापती असलेल्या त्यांच्या पत्नी ललिता मट्टाणी हे दोघे सायंकाळी घरीच होते. सायंकाळी साडेसात-पाऊणेआठ वाजताच्या दरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घरात प्रवेश केला. जवळच्या पिस्तुलातून त्यांनी घिसू यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि घरातून पळ काढला.
नक्षलवाद्यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानात शिरून ही हत्या केलीय. विशेष म्हणजे हे शासकीय निवासस्थान एटापल्लीच्या अगदीमुख्य रस्त्यावर असून तेथे वर्दळही असते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते असलेल्या घीसू मट्टामी यांचा या भागातील सामाजिक कार्यात मोठा सहभाग होता. नक्षल वाद्यांच्या शीघ्र पथकानं ही हत्या केल्याचं बोललं जातंय. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, २५ मे रोजी काँग्रेसचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य बापू तलांडी यांची माओवाद्यांनी हत्या केली होती.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, May 30, 2014, 23:22