Last Updated: Monday, March 25, 2013, 22:09
www.24taas.com, चंद्रपूरगरीब असल्याचं सांगत, आयएएस परिक्षेच्या कोचिंगसाठी आर्थिक मदत उकळणा-या एका मिस्टर नटवरलालला चंद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. राहुल मासीरकर असं या ठकाचं नाव आहे. त्यानं चंद्रपूर आणि पुण्यातल्या अनेक राजकीय नेत्यांना गंडा घातल्याचं समोर आलं आहे.
राहुलला स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी व्हायचे स्वप्न होते. त्यासाठी त्याने चंद्रपूर शहरातील विविध संस्थांमध्ये प्रवेशाचा प्रयत्नही केला. दिल्लीत प्रशिक्षण सुरु आहे त्यासाठी पैशाची गरज आहे अशी टेप लावत राजकीय नेत्यांकडं तो आर्थिक मदत मागत असे. यापैकी काही कार्यकर्त्यांनी त्याच्या नावावर वर्षभर ठराविक रक्कम बँक खात्यात जमाही केली होती.
या होतकरू मुलाकडे नाटकबाजी करून विनासायास पैसा यायला लागल्यावर हा पैसा सिगरेट , दारू व चक्क बारबालांवर उधळण्याची प्रकरणे बाहेर येऊ लागली..मात्र ही बनवाबनवी अखेर उघड झाली. अन हा भावी IAS गजाआड झालाय.
First Published: Monday, March 25, 2013, 22:09