Last Updated: Tuesday, January 28, 2014, 11:43
www.24taas.com, झी मीडिया, नागपूरनागपूर-अमरावती रस्त्यावर खुर्सापूर येथे सोमवारी मध्यरात्री रुग्णाला घेवून जात असलेल्या रुग्णवाहिका आणि खासगी बसमध्ये झालेल्या अपघातात सहा जण ठार झालेत. या अपघातात रुग्णवाहिकेच्या चालकासह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला.
अजय यादव यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय रुग्णवाहिकेतून घेवून जात होते. त्याच वेळी खासगी बसने रुग्णवाहिकेला जोरदार धडक दिली. रुग्णवाहिका भुसावळहून नागपूरकडे येत होती. तर, बस नागपूरहून धुळ्याकडे जात होती.
मृतांमध्ये रुग्णवाहिकेचा चालक पितांबर पाटील (२५) याच्यासह अजय यादव (५८), विजय यादव (३८), नलिनी यादव (३६), अंकित यादव (३६), मंगेश यादव (३४) यांचा समावेश आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, January 28, 2014, 10:12