नागपूर, विदर्भात पूरपरिस्थिती, Nagpur flood situation

नागपूर, विदर्भात पूरपरिस्थिती

नागपूर, विदर्भात पूरपरिस्थिती
www.24taas.com,झी मीडिया, नागपूर

नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळसह संपूर्ण विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पुरामुळं अनेक ठिकाणची वाहतूक बंद झाली असून, पिकंही धोक्यात आलीय.

यवतमाळमध्ये जोरदार पाऊस सुरूय. आर्णीमधल्या अरूणावती नदीला आलेल्या पुराचं पाणी 400 ते 500 घरांत शिरलंय. त्यामुळं लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलंय. तर पांढरकवडा शहरात खुनी नदीचं पाणी वस्तीत शिरलंय. तसंच नागपूर-तुळजापूर राज्य मार्ग बंद झालाय. कोपा मांडवीजवळ नाल्याला पूर आल्यानं इथली वाहतूकही ठप्प झालीय. झरीजामनी तालुक्यातल्या दाभा, डोरली, आहेराल्ली, सतपल्ली, कमळवेल्ली ही गावंही पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्यानं वेढली असून त्यांचा संपर्क तुटलाय.

जिल्ह्यात ४ दिवसांत झालेल्या पावसानं २४३ घरांची पडझड झालीय. तसंच 1 शेतमजूर वीज कोसळून ठार झालाय. तर ५ गायींचाही मृत्यू झालाय. तर गोंदिया जिल्ह्यात कोसळणा-या मुसळधार पावसामुळं वाघ नदी दुथडी भरून वाहू लागलीये. आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात तब्बल 156 मिलीमिटर पावसाची नोंद झालीय.

गेल्या पावसामुळं चंद्रपूर-हैदराबाद हायवे, चंद्रपूर-अहिरी मार्ग बंद झालाय. भंडा-यात अतिवृष्टीमुळं वैनगंगेनं धोक्याची पातळी गाठलीय. पुलांवरून पाणी वाहत असल्यानं अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झालीय.

गोंदिया जिल्ह्यात कोसळणा-या मुसळधार पावसामुळे वाघ नदी दुथडी भरून वाहू लागलीये. गोंदिया-बालाघाट जिल्ह्यांना जोडणा-या रजेगाव पुल पाण्याखाली गेला असून मध्यप्रदेश-महाराष्ट्रादरम्यानची वाहातूक ठप्प झालीये. आता पर्यंत गोंदिया जिल्ह्यात तब्बल 156 मिलीमिटर पावसाची नोंद झालीय.

गेल्या तीन वर्षां पासून ह्या जुन्या पुलाच्या बाजूला नवीन पूल बांधण्यात येत आहे मात्र तो अद्याप तरी पूर्ण झालेला नाही. त्यामुळे या मार्गावरून दोन्ही राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांना बरच मनस्ताप सहन करावा लागतोय…

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 17, 2013, 09:51


comments powered by Disqus