Last Updated: Thursday, October 11, 2012, 12:11
www.24taas.com, नागपूरनागपुरातील गुंड इक्बाल शेख हत्याप्रकरणी हलगर्जीपणाचा ठपका ठेवून पोलीस निरीक्षकाला निलंबित करण्यात आलं आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश जाधव यांना निलंबित करण्यात आलं आहे.
नागपुरातल्या वसंतराव नाईक झोप़डपट्टीत इक्बाल शेख आणि अक्रम शेख यांनी एका महिलेची छेड काढली होती. त्यामुळं संतप्त झालेल्या नागरिकांनी इक्बाल याची ठेचून हत्या केली.
या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अनेकवेळा पोलिसात तक्रार करूनही पोलिसांनी योग्य ती कारवाई न केल्याने स्थानिकांनी हे पाऊल उचलले. आणि त्यामुळेच पोलिसांविरोधात स्थानिकांनी निदर्शने केली होती.
First Published: Thursday, October 11, 2012, 11:51