अमरावतीतून नवनीत कौर राष्ट्रवादीच्या उमेदवार navneet kaur contesting from amravati

अमरावतीतून नवनीत कौर राष्ट्रवादीच्या उमेदवार

अमरावतीतून नवनीत कौर राष्ट्रवादीच्या उमेदवार

www.24taas.com, झी मीडिया, अमरावती

अमरावती मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत कौर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे.

बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या नवनीत कौर या पत्नी आहेत. नवनीत कौर दाक्षिणेत अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात.

नवनीत कौर यांचा अभिनय असलेले काही चित्रपटांची गाणी यू-ट्यूबवरही आहेत.

नवनीत कौर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर लोकांना त्यांच्या अभिनयाचीही आठवण झाली आहे. व्हॉटस अपवर नवनीत कौर यांच्या फोटोंना उधाण आलं आहे.

नवनीत कौर यांच्या आयुष्यात आमदार रवी राणा आल्यानंतर, त्याचं आयुष्य आणखी बदलून गेलं, आणि राजकीय क्षेत्रातही आता नवनीत कौर यांचं नाव चकाकणार आहे.

अमरावतीत २०११ साली सर्वात मोठ्या सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं, रवी राणा आणि नवनीत कौर हे विवाहबद्ध झाले. दरम्यान ३१०० जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा झाला होता.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 1, 2014, 17:59


comments powered by Disqus