चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तोडफोड NCP people attack on Private limited company

चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तोडफोड
www.24taas.com, चंद्रपूर

चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहराला पाणीपुरवठा करणा-या खाजगी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे.

पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी मनपानं उज्ज्वल कंन्स्ट्रक्शन या खाजगी कंपनीकडे दिलीय. उन्हाळ्यामुळे सध्या पाणीपुरवठ्याच्या अनेक तक्रारी शहरात आहेत. आणि त्यावर कंपनीकडून काहीही पावलं उचलल्याचं दिसत नाही. म्हणूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशिरा जलभवन परिसरात असलेल्या या कंपनीच्या कार्यालयात पोचून कार्यालयाची प्रचंड नासधूस केली.या वेळेस कार्यालयात केवळ एकच कर्मचारी उपस्थित होता.


मनसोक्त धुडगूस घालून शिवीगाळ केल्यावर त्यांनी उपस्थित कर्मचा-याला चक्क आपलं visiting card दिले. त्यावर संदीप यासलवार, नेता - शहर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस लिहिलं आहे. तसंच कार्डवर शरद पवार आणि अजितदादा यांचे फोटोदेखील आहेत. काहीवेळीत हे कार्यकर्ते पसार झाले. राष्ट्रवादीच्या या स्थानिक नेत्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय.

First Published: Wednesday, April 17, 2013, 20:00


comments powered by Disqus