Last Updated: Monday, October 7, 2013, 20:58
ऐन पावसळ्यात टँकरच्या पाण्यात हात धुवून घेण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये सुरू आहे. सिन्नर तालुक्यात ग्रामस्थांच्या वाटचं पाणी भलतीकडेच वाहतंय.... या घोटाळ्या प्रकरणी तहसीलदार, गटविकास अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करण्यात आलीय.
Last Updated: Saturday, August 24, 2013, 18:13
मुंबईत गिरगाव चौपाटीजवळ पाईपलाईन फुटलीय. ३२ इंच व्यासाची ही पाईपलाईन आहे. पाईपलाईन फुटल्यानं वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. या पाईपलाईनफुटीमुळे आजा गिरगांव, ठाकूरद्वार इथला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे.
Last Updated: Saturday, August 10, 2013, 20:22
नाशिकला पाणी पुरवठा करणा-या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने शहरातील पाणी कपात रद्द करण्याची घोषणा महापौरांनी केली. या घोषणेला आठ दिवस उलटून गेलेत. मात्र अद्यापही प्रशासनाने पाणी कपात दूर केली नसल्याने हतबल मनसेच्या नगरसेवकांनीच आता आंदोलनाचा इशारा दिलाय.
Last Updated: Thursday, August 8, 2013, 20:25
मुंबईतील अडीच हजार इमारती मुंबई महापालिकेनं धोकादायक घोषित केल्या होत्या. या इमारतींचं तोडलेलं पाणी तातडीनं सुरू करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.
Last Updated: Monday, June 3, 2013, 19:03
कधी एकदा पाऊस येतो, आणि भरपूर पाणी मिळतं, असं दुष्काळग्रस्तांना झालंय. निसर्गानं कृपा दाखवली, तरी आपल्या प्रशासकीय उदासीनतेमुळे ग्रामीण भागातल्या जनतेपासून पिण्याचं पाणी कोसो दूर राहील, अशीच चिन्हं आहेत.
Last Updated: Wednesday, April 17, 2013, 20:00
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शहराला पाणीपुरवठा करणा-या खाजगी कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली आहे.
Last Updated: Wednesday, March 6, 2013, 20:08
नाशिकच्या पाखलरोड, अशोका मार्ग परिसरातले शेकडो नागरिक आज पाण्यासाठी रस्त्यावर उतरले. वर्षभरापासून कमी दाबानं पाणी येतंय. त्यात गेले आठ पंधरा दिवसांपासून फक्त दहा ते पंधरा मिनीटंच पाणी येतंय.
Last Updated: Monday, October 29, 2012, 08:08
नैसर्गिक उतार लक्षात घेत पावसाळ्यातील पाणी अडविण्याचं काम इथं जोमाने सुरु झालय. आमदार अमरिश पटेल यांनी केलेल्या या कामामुळे नव्वद बंधारे तयार झाले असून तीस किलोमीटरचा परिसर `सुजलाम सुफलाम` झालाय.
Last Updated: Tuesday, May 29, 2012, 15:52
पाणी पुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळेंनी शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा केली असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ढोबळेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलीय.
Last Updated: Sunday, May 27, 2012, 23:15
येत्या काही दिवसात पुणेकरांना प्रचंड पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे. असं असतानाही पुण्यातली पाणी गळती थांबवण्यात पुणे महानगरपालिका अपयशी ठरतेय
Last Updated: Friday, May 18, 2012, 08:37
मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ज्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागत आहेत. त्या भागातल्या नागरिकांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागतेय. शहापूर तालुक्यात भातसा धरण आहे त्याच्या आसपासच्या गावात पाण्याची तीव्र टंचाई आहे.
Last Updated: Thursday, March 29, 2012, 20:24
उन्हाळा आणि पाणी टंचाईनं हैराण झालेल्या पुणेकरांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे. एक वेळच्या पाणीपुरवठ्याबरोबरच आता आठवड्यातून एक दिवस संपूर्ण पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.
आणखी >>