आता मतदार केंद्राची माहिती मिळणार एसएमएसद्वारे! Now, get your voting booth details via SMS

आता मतदार केंद्राची माहिती मिळणार एसएमएसद्वारे!

आता मतदार केंद्राची माहिती मिळणार एसएमएसद्वारे!
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या वाढावी म्हणून निवडणूक आयोग एक नवं अभियान राबविणार आहे. या अभियाननुसार, आपल्या मतदान केंद्राची माहिती आता फोनवरून सहज उपलब्ध होऊ शकणार आहे.

यासाठी आयोगाकडून नंबर दिला जाणार असून, त्यानंबरवरुन मतदाराला त्यांचं नाव, पत्ता एसएमएस करुन पाठवावा लागेल. आपला पत्ता आणि नाव आपण पाठवताचं, तुमचं मतदान केंद्र कोणतं? त्याची माहिती आपल्याला मिळेल. तसंच मतदारांना आलेल्या अडचणीसुद्धा फोनवरुन सोडविल्या जाणार आहेत.

लवकरच या अभियानचे क्रमांक सुरु होणार आहेत. तसेच मतदारांच्या समस्या आणि अडचणी दूर करण्यासाठी १८००२३३१०९५ आणि ०७१२-२५४७८४ हे टोल फ्री नंबर दिले आहेत अशी माहीती, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांनी दिली.

नवीन मतदारांना २१ मार्चपर्यंत नोंदणी करता येईल. नागपूरमध्ये ९ मार्चला झालेल्या अभियानमध्ये ३२ हजार नवीन मतदारांची नोंद झालीयं. तसेच रामटेक आणि नागपूर लोकसभा मतदारसंघात हे अभियान राबविले जातंय. या अभियानमधून मतदानांत ७० टक्के वाढ होण्याची शक्यता निवडणूक आयोगाने वर्तवली आहे.

रवींद्रनाथ मिश्रा यांनी दिलेल्या माहीतीनुसार, निवडणूक आयोगाने दिलेल्या ऑनलाईन मतदार नोंदणीचा चांगलाच फायदा झाला आहे. अनेकांनी मतदार नोंदणी ऑनलाईनद्वारेचं केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 13, 2014, 16:19


comments powered by Disqus