मदमस्त पार्टीत अल्पवयीन उच्चभ्रू मुलींचे चाळे , participation minor girls alcohol party in Nagpur

मदमस्त पार्टीत अल्पवयीन उच्चभ्रू मुलींचे चाळे

मदमस्त पार्टीत अल्पवयीन उच्चभ्रू मुलींचे चाळे
www.24taas.com , झी मीडिया, नागपूर

पुण्यातील चिल्लर पार्टीनंतर आता नागपुरात मदमस्त पार्टीत अल्पवयीन उच्चभ्रू मुली सहभागी झाल्याचे पुढे आले आहे. या मुली नशेत तर्र झाल्याने पोलीसही चक्रावलेत. पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेतील १८ तरुणी आणि २५ तरुणांना ताब्यात घेतले आहे.

वर्धमाननगरातील एका हॉलेटमध्ये मदमस्त पार्टी सुरू होती. या पार्टीची माहिती गुन्हेशाखा पोलिसांना मिळाली. त्यानंतर हॉटेलवर छापा टाकला. यावेळी मद्यधुंद अवस्थेतील ४३ मुले सापडलीत. यात १८ तरुणींचा समावेश होता. धक्कादायक म्हणजे यात अल्पवयीन मुली सहभागी झाल्या होत्यात. पोलिसांनी हॉटेलचा संचालक राजू सैनी याच्याविरुद्ध कारवाई केली आहे.

बारचा परवाना नसतानाही मद्य पुरविणाऱ्या या बारमध्ये ही पार्टी सुरू असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली. पोलिसांनी रविवारी छापा टाकला. यावेळी तरुण, तरुणी मद्यधुंद अवस्थेत थिरकत होते. तसेच त्यांचे चाळे सुरू होते. पोलीस आयुक्त के. के. पाठक, पोलीस सहआयुक्त संजय सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई केली. दरम्यान, या कारवाईनंतर वेगळीच माहिती पुढे आली. सर्वच तरुण-तरुणी उच्चभ्रू कुटुंबातील आहेत.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Tuesday, August 27, 2013, 10:46


comments powered by Disqus