टार्गेट पूर्ण करण्यासाठी केली तरुणाला फसवून नसबंदी person sabotaged for Nabandi

टार्गेट पूर्ण करण्यासाठी केली तरुणाला फसवून नसबंदी

टार्गेट पूर्ण करण्यासाठी केली तरुणाला फसवून नसबंदी
www.24taas.com, गोंदिया

आपले वर्षाचे टार्गेट पूर्ण करण्याकरिता चाकरमानी वेगवेगळी शक्कल लढवतात. मात्र एक परिचारिका कुठल्या स्तराला जाऊ शकते याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळालाय. देवरी तालुक्यातील भानोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात खोटी माहिती अर्जात भरून एका तरुणाची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्यात देवरी तालुक्यातल्या भरत मानकर याची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पिडीत भरत मानकर या युवकाचे वय हे ३० वर्ष असून या शस्त्रक्रियेच्या अर्जात त्याचे वय ४० दाखवण्यात आले आहे. आपली फावणूक झाल्याचा दावा आता या युवकाने केला आहे...

भानोडी आरोग्य केंद्रातील दीप्ती खरवडे या परिचारिकेने दोन हजार रुपये देऊन भरतच्या कौटुंबिक शस्त्रक्रियेच्या कोऱ्या फॉर्म वर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्या नंतर त्याची शत्रक्रिया करण्यात आली. भरतला अपत्य नाहीत. असं असतांना देखील फॉर्म वर त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असल्याची खोटी माहिती टाकण्यात आली. सोबतच त्याच्या पत्नीचे वयही चुकीचं टाकण्यात आलं आहे. याच खोट्या फॉर्मच्या आधारावर त्याची जबरदस्तीने शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा आता तो करीत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर भरतची प्रकृती बरीच खालावली होती. त्याला तात्काळ गोंदिया येथील इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

असे असतांना देखील ज्या डॉक्टरांनी त्याची शस्त्रक्रिया केली तेच डॉक्टर आता आपले हात झटकतांना दिसत आहेत. आपल्याकडे आलेल्या फॉर्मकडे पाहूनच त्या संबधित व्यक्तीची शारीरिक तपासणी करून आपण शस्त्रक्रिया करत असल्याचा दावा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर करत आहेत. मात्र घडलेल्या प्रकारची माहिती नसल्याचा दावा डॉक्टर करत आहेत...
भरतच्या गरिबीचा फायदा घेत केवळ आपले टार्गेट पूर्ण करण्याकरिता परिचारिकेचे हे कृत्य संतापजनक आहे. नुकतंच लग्न झालेल्या या तरुणाचं यामुळे संपूर्ण आयुष्यच उद्वस्त झालं आहे. मात्र अशात जिल्हा प्रशासन या प्रकरणी मौन बाळगून आहे. मात्र एका युवकाचा संसार उद्वस्त करणाऱ्या परिचारिकेवर काय कारवाई होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे...

First Published: Monday, October 8, 2012, 16:32


comments powered by Disqus