पेट्रोल पंपच्या आवारात स्फोट, एकाचा मृत्यू, Petrol pump blast, one death

पेट्रोल पंपच्या आवारात स्फोट, एकाचा मृत्यू

पेट्रोल पंपच्या आवारात स्फोट, एकाचा मृत्यू
www.24taas.com, मुंबई

अकोल्यातील अशोक वाटिका चौकातील अग्रवाल पेट्रोल पंपावर स्फोट झालाय. य़ा स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. पेट्रोल पंपावरील पेट्रोल टाकीच्या दुरुस्तीचे काम करतांना हा स्फोट झालाय. या स्फोटामुळे या पेट्रोल पंपाला लागून असलेल्या राठी पेट्रोल पंपाचे मोठे नुकसान झालेय. स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की दोन टन वजनाची टाकी आपल्या जागेवरून सुमारे तीस ते चाळीस फुट मागे फेकली गेली.

ही टाकी पेट्रोल पंपाच्या आवारात उभ्या एका ट्रकवर आदळली. यामुळं ट्रकमध्ये बसलेला क्लीनर या टाकीखाली दाबला गेला. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झालाय. मृतकाचे नाव अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये. टाकीच्या आतमध्ये गैस जमा झाल्याने हा स्फोट झाल्याचे बोलले जातेय. यातच पेट्रोल पंपाच्या आवारात उभ्या एका ट्रकचा क्लीनर या टाकीखाली दाबला जावून त्याचा जागीच मृत्यू झालाय. मृतकाचे अद्यापही स्पष्ट झालेले नाहीये.

दरम्यान या स्फोटामुळे बाजूच्या राठी पेट्रोल पंपाचे आणि काही वाहनांचे मोठे नुकसान झालेय. हा स्फोट झाला तेंव्हा राठी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होतीय. स्फोटावेळी या परिसरात मोठी पळापळ झालीय. पोलीस आणि अग्निशमन विभागाने वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणलीय. या स्फोटावेळी राठी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळलीये.

First Published: Monday, November 26, 2012, 19:49


comments powered by Disqus