तुमची पुरणपोळी टिकणार आता तब्बल सहा महिने, Puranpoli new packing technique

तुमची पुरणपोळी टिकणार आता तब्बल सहा महिने

तुमची पुरणपोळी टिकणार आता तब्बल सहा महिने
www.24taas.com, नागपूर

होळी म्हंटलं की आपसूकच आठवण येते ती म्हणजे पुरणपोळीची... होळीही जवळ आली आहेच. घराघरात पुरणपोळीचा स्वाद दरवळणार मग आपल्याला आठवण येते ती दूरदेशी असणाऱ्या आप्तेष्ठांची. पण इतक्या दूर पुरणपोळी पाठवायची तर तिचा स्वाद जसाच्या तसा रहायला हवा...

आता ते शक्य झालंय. नागपूरच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या पॅकेजिंग विभागाची विद्यार्थिनी वर्षा फुलपगार हिनं एक अनोखं तत्र विकसीत केलं आहे. यामुळे पुरणपोळी एक दोन दिवस नव्हे, तर तब्बल सहा महिने जशीच्या तशी ताजी राहू शकेल... विभागप्रमुख दिलीप कावडकर यांचं मार्गदर्शन वर्षाला मिळालं आहे.

ही पुरणपोळी टिकवताना त्याची चव जशीच्या तशी राहील असाच प्रयत्न केला गेला आहे.. मराठी पदार्थांची अस्सल शान आणि खास पसंतिचा मान असलेली ही पुरणपोळी आता थेट जाणार आहे अमेरिकनांच्या ताटात...

First Published: Tuesday, March 5, 2013, 17:48


comments powered by Disqus