चंद्रपुरात पावसाचा पुन्हा धुमाकूळ , Rain in Chandrapur

चंद्रपुरात पावसाचा पुन्हा धुमाकूळ

चंद्रपुरात पावसाचा पुन्हा धुमाकूळ
www.24taas.com, झी मीडिया, चंद्रपूर

आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसानं चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा धुमाकूळ सुरु केलाय. मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह कोसळत असलेल्या पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलं आहे.

अचानक सुरु झालेल्या कोसळधारेने नागरिकांना उसंत घेऊ दिली नाही. या पावसाने चंद्रपूर- बल्लारपूर वळण मार्गावर पाण्याचे लोंढे आल्यानं वाहतूक विस्कळीत झालीय. तर शहरातून वाहणा-या झरपट नदीनं विशाल रूप धारण केलंय. या नदीच्या किना-यावर राहणा-या नागरिकांना रात्रीच अन्यत्र आश्रयासाठी जावं लागलंय.

काही भागात पोहचणंच अशक्य असल्याने या भागातील शाळांना नाईलाजानं सुटी जाहीर करावी लागलीय. शहरातल्या अनेक भागात पावसाच्या तडाख्यानं शेकडो घरं कोसळल्याच्या घटना पुढे येत असून या पावसानं चंद्रपूरचं जनजीवन विस्कळीत झालंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, August 16, 2013, 12:31


comments powered by Disqus