नागपुरात `आप`मध्ये बंडाचा `झेंडा` rebels in nagpur aap

नागपुरात `आप`मध्ये बंडाचा `झेंडा`

नागपुरात `आप`मध्ये बंडाचा `झेंडा`

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून आम आदमी पार्टीमध्येही बंडाची ठिणगी पेटलीय.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून अंजली दमानिया यांची उमेदवारी घोषित झालीय. परंतु त्यांच्या उमेदवारीला सामाजिक कार्यकर्त्या रूपा कुलकर्णी यांनी जोरदार आक्षेप घेतलाय.

दमानियांच्या उमेदवारीची थेट घोषणा झाल्यानं आपच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार ठरवण्यासाठी आपच्या नेत्यांनी जवळपास 66 जणांच्या मुंबईत मुलाखती घेतल्या होत्या.

या मुलाखतीनंतर नागपूरमधून रूपा कुलकर्णी यांचे नाव जवळपास निश्चित झालं होतं. मात्र ऐनवेळी चक्र फिरली आणि दमानिया यांच्या उमेदवारीची घोषणा झाली.

नागपूर बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी दिली म्हणून आम आदमी पार्टीत दुफळी निर्माण होण्याची चिन्हं आहेत.

आगामी निवडणुकीत ही पक्षांतर्गत नाराजी दमानिया यांना भोवण्याची शक्यता आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, February 17, 2014, 17:46


comments powered by Disqus