Last Updated: Thursday, May 30, 2013, 23:12
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईराज्याचे गृहमंत्री आणि गडचिरोलीचे पालकमंत्री आर. आर. पाटील हे नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचं उघड झालंय. नक्षलींना लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांनी काही नेत्यांना इशारा दिलाय, त्यात आर. आर. पाटील यांचाही समावेश आहे.
आर. आर. पाटील गडचिरोलीचे पालकमंत्री आहे. गडचिरोलीचं पालकत्व स्वीकारल्यापासून त्यांनी गडचिरोलीत विकासकामं सुरू केली आहेत. नक्षलवादी या विकासकामांच्या विरोधात आहेत. त्यामुळेच आर. आर. नक्षलवाद्यांच्या हिटलिस्टवर आहेत.
झेड सुरक्षेत असतानाही महेंद्र कर्मांना आम्ही संपवू शकतो. तर तुम्हीही आपण सुरक्षित असल्याच्या भ्रमात राहू नये असं नक्षलींनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलंय. बुलेटप्रूफ गाड्याही तुम्हाला वाचवू शकणार नाहीत, अशी धमकीच नक्षलवाद्यांनी दिली आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, May 30, 2013, 23:12