एसटी आणि स्कूलव्हॅनचा अपघात; चार चिमुकले ठार, नऊ जखमी, st bus & school van accident in amravati

स्कूल व्हॅनचा अपघात; चार चिमुकले ठार, नऊ जखमी

स्कूल व्हॅनचा अपघात; चार चिमुकले ठार, नऊ जखमी
www.24taas.com, अमरावती

अमरावतीत एका स्कूल व्हॅनला भीषण अपघात झालाय. अपघातात चार विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर नऊ विद्यार्थी जखमी झालेत. दोन मुलांना किरकोळ जखमा झाल्यात.

सकाळी साडेआठच्या सुमारास नवसारी चौकात एसटी आणि स्कूल व्हॅनमध्ये हा अपघात झालाय. एसटी बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असताना व्हॅनला अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. अपघातग्रस्त स्कूल व्हॅनमध्ये १३ मुलं होती. यातील चार मुलं अपघातात जागीच ठार झाली. पवन पवार, रोहित कुकडे आणि उत्कर्ष निर्मल अशी मृत विद्यार्थ्यांची नावं आहेत. जखमी मुलांना अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

अपघातग्रस्त व्हॅनमधील विद्यार्थी अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूलचे विद्यार्थी असल्याची माहिती समजतेय. या अपघातामुळं शालेय विद्यार्थ्यांच्या असुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.

First Published: Tuesday, November 27, 2012, 13:41


comments powered by Disqus